जळगाव – जळगाव महानगरपालिकेच्या नगररचना सहाय्यकास १५ हजारची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
यातील तक्रारदार यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण मंजूर करण्यासाठी,परवानगी साठी नगर रचना विभाग मनपा जळगांव येथे एकूण 3 प्रकरणे दाखल केली आहेत. त्यात पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी पाठवले असता मनपा नगररचना सहाय्यक, मनोज समाधान वन्नेरे, यांनी पहिल्या प्रकरणात 21000 व तडजोड अंती 15000 व दुसऱ्या प्रकरणात 15000 रुपयाची आयुक्त, मनपा जळगाव व सहाय्यक संचालक (अतिरिक्त कार्यभार ) नगर रचना विभाग, मनपा जळगाव यांचेसाठी एकूण 30000 ची मागणी करून पहिल्या प्रकरणात 15000 रुपये आज रोजी स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
सदर कारवाई –
जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, Psi सुरेश पाटील,पोना किशोर महाजन , राकेश दुसाने यांनी केली.