गुन्हेगारीनंदुरबारब्रेकिंग

शहाद्यात नातवाने केली आजोबांची हत्या : अवघ्या साडेचार तासात खुनाचा उलगडा..

दोन अल्पवयीन संशयित ताब्यात.

(नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : आपल्या वडिलांना सोबत ठेवत नाही तसेच नेहमी टोचून बोलत अपमानास्पद वागणूक देत असल्याचा राग येऊन नातवाने आपल्या मित्राच्या सहाय्याने साठ वर्षीय आजोबाचा खून केल्याची घटना शहादा तालुक्यातील शिरूड रस्त्यावर घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या साडेचार तासात पोलिसांनी या घटनेचा तपास लावत दोन अल्पवयीन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतल्यानंतर सदर खूनाचा तपास लागला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 08 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास दशरथ शंकर राजे वय 60 हे आपल्या मोठा मुलगा भरत राजे याच्या मीरा नगर येथील घरी जेवणासाठी गेले होते. जेवण करून ते पुन्हा आपल्या तापी रेसिडेन्सी येथील घरी परत येत असताना रात्री नऊ वाजेच्या दरम्यान त्यांचा नातू व त्याचा मित्र या अल्पवयीन मुलांनी त्यांच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करीत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांना तेथेच सोडून त्यांची स्कुटी घेऊन फरार झाले.

दरम्यान रात्री नऊ वाजले तरी आपले वडील घरी आले नाही म्हणून मयत दशरथ राजे यांचा दुसरा मुलगा राहुल हा त्यांचा शोध घेण्यासाठी मीरा नगरकडे जात असताना त्यांना शहादा शिरुड रस्त्यावरील गॅस गोडाऊनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बोर्डाकडे एक वृद्ध रस्त्यावर पडलेला दिसला. काही अपघात घडला असावा अशा शंकेने राहुल हा तेथे जावून पाहिले असता ती व्यक्ती त्याचे वडील असल्याचे दिसून आले. लागलीच त्याने आक्रोश करीत सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण  शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी दशरथ राजे यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत असताना दशरथ राजे यांची प्राणज्योत मालावली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.

पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला. याच दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल भरत उगले याला गुप्त माहिती मिळाली की, मयताच्या नातवाने त्यांच्यावर हल्ला केला आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यात संशयित अल्पवयीन आरोपी व त्याचा मित्र हे खेतिया रोडच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मागोवा घेतला असता दरा फाट्याजवळ म्हसावदकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्कुटी उभी असल्याचे आढळून आले. पोलिसांनी स्कुटी ताब्यात घेतली व दोन्ही संशयित अल्पवयीन आरोपींचा शोध घेत असताना त्यांना ते मीरा नगर येथील राहत्या घरी आढळून आले. अवघ्या साडेचार तासात पोलिसांनी दोन्ही संशयतांना ताब्यात घेतले.

रात्रभरच्या तपासा दरम्यान संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार माझे आजोबा हे वडिलांना सातत्याने अपमानास्पद वागणूक देत असल्याने आपण त्यांचा खून केल्याची कबुली नातवाने दिली. एका मित्राच्या सहाय्याने आपण स्कुटी म्हसावद रस्त्यावर लावली तर गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला चाकू एका मित्राच्या मदतीने भाऊतात्या पंपाच्या पुढे डोंगरगाव रस्त्यालगत लपाविल्याचे सांगितले. रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचेही त्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला. त्या दोघांना उद्या मंगळवारी 10 डिसेंबरला नंदुरबार येथील जुवेनाईल न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी आणखी आरोपींची संख्या वाढू शकते अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी राजन मोरे यांनी दिली. या संपूर्ण घटनेचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप सिंह मोहिते, सहाय्यक फौजदार प्रदीप राजपूत, हवालदार देवा विसपुते, दिनकर चव्हाण, भरत उगले, युवराज राठोड, भगवान साबळे यांच्या पथकाने केला.

दरम्यान, आज सकाळी ग्रामीण रुग्णालय येथे मयताच्या पार्थिवाचे शवाविच्छेदात केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. दुपारी शोकाकुल वातावरणात मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे