लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी परिसरातील नागरिकांचा कचरा संकलन केंद्रा विरोधात नाराजी..

जळगाव – शहरातील प्रभाग क्र. १६ मधील लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी आदि परिसरातील नागरिकांनी जळगाव शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त निर्मला गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले. जळगाव मनपा तर्फे सम्राट कॉलनी, रिलायन्स पेट्रोल पंपासमोर, वडेश्वर महादेव मंदिराजवळ कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात येणार होते. सदर कचरा संकलन केंद्राने परिसरातील रहिवाश्यांना दुर्गंधी व सांडणाऱ्या कचऱ्याचा सामना करावा लागेल तसेच त्यांचे आरोग्य याने धोक्यात येऊ शकते. सदर परिसर हा दाट वस्तीचा असून बाजूलाच आंगणवाडी शाळा व रहिवास परिसर असून सर्वांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होईल हे लक्षात घेऊन महानगरपालिकेने सदर कचरा केंद्र दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करावे याविषयाचे निवेदन उपायुक्त निर्मला गायकवाड यांना परिसरातील नागरिकांनी दिले.
यावेळी तेजस श्रीश्रीमाळ, प्रसन्ना बागूल, निलेश चव्हाण, जितू परदेशी, विक्की महाले, उमेश कोळी, कैलास चौधरी, संकेत बागूल, गौरव नाथ, उषाबाई चौधरी, लताबाई जोशी, आशा सोनवणे, सुनिता परदेशी, सुनिल शिंदे आदी उपस्थित होते.