हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट चे पंधरा विद्यार्थ्यां शासकीय सेवेत रुजू..
बि एस एस बोर्डाने इन्स्टिट्यूट ला प्रथम क्रमांकाचे नामांकन देवून करण्यात आले पुरस्कृत,इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना देण्यात आला खाजगी क्षेत्रात रोजगार
जळगाव (प्रतिनिधि)- स्वप्नसाकार फाउंडेशन संचलीत हेल्थ प्लस इन्स्टिट्युट जळगाव येथे गेल्या 8 वर्षापासुन पॅरामेडिकल क्षेत्रात विविध टेक्निशियन असिस्टंट कोर्सेस चालवते. इन्स्टिट्यूट २०१६ पासून कार्यरत आहे. १० वी १२वी ग्रॅज्युएशन नंतरचे हॉस्पीटल क्षेत्रातील टेक्निशियन व असिस्टंट कोर्सेसचे प्रशिक्षण देऊन सर्टिफिकेट व जॉब देण्याचे कार्य संस्थे मार्फत केले जाते. गरजु महिला, मुल मुली यांना प्रशिक्षीत करुन स्वावलंबी करण्यासाठी इन्स्टिट्यूट सक्रिय आहे.
जळगावचे बहुतांश डॉक्टर हॉस्पीटल संलग्न असुन त्याचे अतूट नाते या ठिकाणी जुळलेले आहे. जळगावा -मध्ये जवळ-जवळ 50 टक्के हॉस्पिटल आहेत व मल्टी स्पेशलिटी हॉस्पीटल मध्ये. MLT/DMLT/x ray , / CT Scan | डायलेसिस टेक्निशियन/ M.R.I/ ICU/ OT/स टेक्नीशियन लोकाची आवश्यकत्ता असते. त्यांना ट्रेनिंग देऊन स्वावलंबी बनवण्याचे कार्य संस्था करते त्याच बरोबर भारत सरकार मान्यता प्राप्त सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी M.P.W कोर्स इन्स्टिट्यूट गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे..तरी या कोर्स ल 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने या कोर्सला मान्यता दिली व शासनाच्या विविध डिपार्टमेंट मध्ये. सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावर संस्थेचे, १५ मुले नियुक्त झाले. खुप अभिमानाची बाब म्हणून या वर्षी भारत सेवक समाज B.S.S या बोर्ड ने हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटला प्रथम क्रमांक हे नामाकन दिउन पुरस्कृत केल आहे. हॉस्पिटल क्षेत्रात व्यतिरिक्त कंपनी क्षेत्रामध्ये ही इन्स्टिट्यूट अग्रेसर कार्य करीत आहे. जळगाव मधील नामांकित रेमंड लिग्रंड कंपन्यांचे फर्स्ट एड सेंटर चालवण्याचे कार्य इन्स्टिट्यूट मार्फत होत आहे. अचानकपणे होणारे अपघात व दुर्घटना. याची मॅनेजमेंट फर्स्ट एड कोर्सच्या माध्यमातून इन्स्टिट्यूट कंपनी त काम करणाऱ्या फर्स्ट एड कोर्सच्या माध्यमातून देत आहे तरी मेडीकल क्षेतात आवड असणाऱ्यानी इन्स्टिट्यूटला अवश्य भेट घ्यावी. तरी भविष्यात सुद्धा हॉस्पिटल क्षेत्रात हॉस्पिटल क्षेत्रातील उस्कृष्ट टेक्निशन असिस्टंट घडविण्याचे कार्य इन्स्टिट्यूट अविरत सुरु ठेवणार आहे.असे संस्थेच्या संचालिका भारती काळे यांनी पञकार परिषदेत सागितले.