MIDC पोलीसांचा अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा : मोठया प्रमाणात गॅस सिलेंडर जप्त..
जळगाव – दि. 08 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत रामेश्वर कॉलनी परीसरात किरण भागवत पाटील हा घरगुती वापराचे गॅस सिलेंडरचे व्यवसायीक सिलेंडर मध्ये रुपांतरीत करुन काळ्या बाजारात विक्री करीत असल्याबाबतची माहीती पोउपनि यांना मिळाली. सदर ची माहीती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवली असता, त्यांनी वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे सदर ठिकाणी छापा मारण्यासाठी एक पथक तयार करुन त्यांना सुचना दिल्या त्यांनी रामेश्वर कॉलनीतील किरण पाटील याचे घरावर छापा मारून कारवाई केली असता, तो घरगुती वापराचे सिलेंडर मशीनच्या साह्याने व्यवसायीक सिलेंडर मध्ये रिफिलींग करुन काळा बाजार करतांना अवैध्यरित्या मिळुन आला. जिल्हाअधिकारी कार्यालयात नेमणुकीस असलेले ना.तहसिलदार राहुल वाघ यांना संपर्क करुन कारवाई बाबतची माहीती दिली असता त्यांनी दोन पंचांसमक्ष जप्ती कारवाई केली. आरोपी किरण पाटील याचे घरात एकुण 1,64,000/- रु. किंमतीचे एकुण 54 गॅस सिलेंडर त्यापैकी घरगुती वापराचे 22, व्यवसायीक वापराचे 32 व घरगुती वापराचे सिलेंडर मधील गॅस काढुन व्यवसायीक सिलेंडर मध्ये भरण्यासाठी वापरात येणारी ईलेक्ट्रीक प्रेशर मोटर हि जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी विरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीतास गुन्हयात अटक करुन न्यायालयासमोर हजर करुन त्याची दि. 11 पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउपनिरीक्षक चंद्रकात धनके, अशोक काळे, पोहेका. राजेंद्र कांडेकर, पोना. हेमंत जाधव, पोना. योगेश बारी, पोका. सिध्देश्वर डापकर, पोका योगेश घुगे यांनी केली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पो.उप. निरी अशोक काळे, पो.शि. नरेंद्र मोरे हे करीत आहे. तरी एमआयडीसी पोलीस स्टेशन कडुन जनतेस आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे अवैधरित्या गॅस रिफिलींग किंवा विक्री कोणी करीत असल्यास त्याची माहीती तत्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनला कळवावी माहीती देणा-या ईसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या
भुसावळात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा जप्त..
व्हॅगनार कारचे टायर फुटल्याने अपघात मोटरसायकल चालक जागीच ठार..