भुसावळात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा जप्त..
27 घरगुती गॅस सिलेंडर व वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याच्या साहीत्यासह एकास अटक.
भुसावळ – दि.०८ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील पथकास बातमी मिळाले वरून भुसावळ शहरातील नसरंवजी फाईल, शिवाजीनगर भागातील शेख नौशाद हा अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर मधुन ऑटो रिक्षात भरणा करीत असल्याची बातमी मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जावून सदर ठिकाणी छापा टाकून शेख नौशाद शेख नजीर, वय ३१, रा. शिवाजीनगर नसरवजी फाईल भुसावळ हा त्याच्या मालकीच्या टपरीमध्ये घरगुती गॅस काळया बाजारात विक्री करण्यासाठी लागणारे २७ गॅस सिलेंडर, १ ऑटो रिक्षा तसेच गॅस भरण्या करीता लागणारे साहित्य असे एकुण १,५७,०००/-रु. कि.चे साहीत्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई मध्ये अवैधरित्या ऑटो रिक्षा मध्ये घरगुती गॅस भरणारा शेख नौशाद शेख नजीर व ऑटो रिक्षा चालक निलेश सुरेश चौधरी, रा.पंढरीनाथ नगर भुसावळ अश्यांना ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई LCB जळगाव यांच्या पथकातील पोउपनिरी शरद बागल, पोह कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, सचिन पोळ, भारत पाटील यांनी केली.