20 हजाराची लाच : शहर पोलीस स्टेशनचे दोघ लाचखोर हवालदार ACB च्या जाळ्यात..
जळगाव – 20 हजाराची लाच घेतांना शहर पोलीस स्टेशन च्या हवालदारांना जळगाव एसीबी रंगेहाथ पकडले असून रविंद्र प्रभाकर सोनार , पोलीस हवालदार, जळगांव शहर पोलीस स्टेशन व धनराज निकुभ , पोलोस हवालदार जळगांव शहर पोलीस स्टेशन असे त्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे केंद्रीय अर्ध सैनिक बल मध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. त्यांचे व त्यांची पत्नी यांचे कौटुंबिक कारणावरून भांडण झाले होते. त्याबाबत त्यांच्या पत्नीने तक्रारदार यांचे विरुद्ध दिनांक 04/02/2025 रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या चौकशी कामीरविंद्र प्रभाकर सोनार , पोलीस हवालदार यांनी तक्रारदार यांना फोन करून चौकशीकामी पोलीस ठाणेस बोलावून घेतले होते. त्यांनी धनराज निकुभ , पोलीस हवालदार यांचेसोबत भेट घेऊन त्यांना गुन्ह्याचे तपासकामी अटक न करण्यासाठी,योग्य ती मदत करण्यासाठी,तसेच त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल न पाठवण्यासाठी स्वतःसाठी व धनराज निकुभ , पोलीस हवालदार यांचे करवी 50 हजार रुपयाची मागणी केली होती.
पोलीस हवालदार धनराज निकुभ ,यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावल्याने तक्रारदार यांनी दि. 11/04/2025 रोजी लाप्रवी जळगाव येथे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून दि. 11/04/2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान धनराज निकुभ , पोलीस हवालदार यांनी तक्रारदार यांना 50 हजार रुपये ची लाच मागणी करून तडजोडीअंती 20000/-रु.स्वीकारण्याची तयारी दर्शविली.त्यावरून आज दिनांक 11/4/2025 रोजी सापळा कार्यवाही दरम्यान रवींद्र सोनार यांनी लाच रक्कम 20,000/- रुपये पंचासमक्ष स्वतः स्वीकारली. रवींद्र सोनार यांना ताब्यात घेण्यात आले असून रवींद्र सोनार व धनराज निकुभ , पोलीस हवालदार या दोन्ही विरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे कलम 7,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई
जळगाव एसीबीचे पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक, स्मिता नवघरे,पोउपनिरी सुरेश पाटील चालक,पोहेकॉ रविंद्र घुगे,पोहेकॉ जनार्दन चौधरी चालक, पोहेकॉ सुनिल वानखेडे,पोना/ बाळू मराठे, पो. कॉ/राकेश दुसाने यांनी केली.