छत्रपती संभाजी नगर मधील बुलेट चोर MIDC पोलिसांच्या ताब्यात..

जळगाव – दि.17 रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपणीय बातमी मिळाली की, अजिंठा चौफुली जळगाव येथे छत्रपती संभाजी नगर मधील एक तरुण महागडी बुलेट चोरी करुन स्वस्तात विक्रि करण्यासाठी अजिंठा चौफुली येथे आलेला आहे अशा बातमीवरून गुन्हे शोध पथक हे अजिंठा चौफुली जळगाव येथे गेले असता मिळालेल्या बातमीप्रमाणे एक तरुण ईसम हा लाल रंगाच्या विना नंबर प्लेटच्या बुलेट सह दिसुन आला.
त्यास सदर पथकाने ताब्यात घेतले. त् त्याने त्याचे नांव साजीद खान शकिल खान रा. छत्रपती संभाजी नगर असे असल्याचे सांगीतले. त्याच्याजवळ मिळुन आलेल्या बुलेट थे कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याजवळ कोणतेही कागदपत्र नसल्याने सदर बुलेटचे चेसीस नंबर ची ऑनलाईन पाहणी केली असता सदरची बुलेट ही पुणे येथील असल्याचे दिसुन आल्याने सदर ईसमास ताब्यात घेवुन त्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील मोटार सायकल चोरी केली असावी या संशयावरुन गुन्हा रजि नंबर 255/2025 बीनएसएस कलम 303 (2) यात अटक करण्यात आली होती. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान सदर आरोपीताने संशईताने अजुन एक YEZDI ROADSTER बुलेट अशी महागडी गाडी काढून दिली आहे. अशा प्रकारे सदर ईसमाकडुन 250,000/- रुपये किंमतीच्या दोन महागड्या बुलेट हस्तगत केल्या असुन, त्याबाबत चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर आणी सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजी नगर येथे मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. संबधीत पोलीस स्टेशनला आरोपी हस्तांतरीत करणेबाबत कळविण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहेका गणेश शिरसाळे हे करीत आहेत.
ईतर महत्वाच्या बातम्या