रावेर

रावेर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची कारवाई अवैध वृक्षतोडीतील मुद्देमालासह 2 ट्रक जप्त..

तपासणी नंतर दोघ ट्रक मुद्देमालासह मध्य प्रदेश वन विभागाच्या स्वाधीन..

रावेर – दि. 05/05/2025 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी,रावेर यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार रावेर ते चोरवड या रस्त्याला गस्त करीत असताना मौजे लोणी गावा लागत एक आईसर ट्रक नंबर-MH04CU5418 तसेच एक ट्रॅक नंबर – MH 19Z7862 दिसून आली त्याची तपासणी केली असता त्यात विनापरवाना पंचरास लाकड मिळून आले. दोन्ही वाहनात ऐकून 31 घ.मी. माल असून त्याची किंमत 43400 एवढी आहे.तसेच वाहनांची किंमत ऐकून 530000 इतकी आहे तरी सदर गुन्हा हा मध्य प्रदेश हद्दीत झाला असून या बाबत भ्रमणध्वनी ने मध्य प्रदेश वनविभागाच्या कर्मचारीयांना कळवण्यात आले. या ठिकाणी मध्य प्रदेश कर्मचारी जागे वर बोलून सदर वाहने त्याच्या ताब्यात देऊन या गुन्हे बाबत पुढील कार्यवाही मध्ये प्रदेश वनविभाग करणार.

सदरची कारवाई ही  जमीर शेख उप वनसंरक्षक, यावल वनविभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई ही अरविंद धोबी वनपाल सहस्त्रलिंग, आयेशा पिंजारी वनरक्षक अहिरवाडी, सविता वाघ वनरक्षक पाडले (खु),जगदीश जगदाळे वनरक्षक जुनोना, सुभाष माळी वनमजूर, विनोद पाटील वाहन चालक यांनी केली. सदरच्या ट्रक व मुद्देमाल हा 1) युनुस दाऊदी वनपाल, 2) आर.डी.काजळे वनरक्षक ,3) वीरेंद्र कुमार वनरक्षक ह्या मध्य प्रदेश वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे