जळगाव जिल्हा

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात 1371 प्रकल्पांपैकी 434 प्रकल्पांचे काम पूर्ण..

जळगाव – जल जीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर झालेल्या 1371 प्रकल्पांपैकी 434 प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील अनेक गावांना आणि वाड्यावस्त्यांना स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा सुरू झाला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी  मीनल करनवाल यांनी हे प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने त्वेळोवेळी स्थानिक पातळीवरील प्रशासन, अभियंते व ठेकेदार यांच्यासोबत नियमित बैठक घेऊन कामांच्या गतीस चालना दिली. या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागांना दिलासा मिळाला आहे. महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी दररोज होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळाली असून ग्रामीण भागात जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत उर्वरित प्रकल्पांचे काम देखील गतीने सुरू असून, लवकरच संपूर्ण जिल्हा ‘हर घर जल’ या ध्येयाच्या दिशेने आगेकूच करेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

ईतर महत्वाच्या बातम्या

“संगणकाच्या युगात शिक्षकांनी स्वतःला संगणकीय दृष्टिकोनातून प्रगत करावे” – CEO मिनल करनवाल यांचे प्रतिपादन

सन २०१७ मध्ये बांधकाम झालेली व्यायाम शाळा आजही बंदच..

जळगाव शहरासह जिल्ह्यात गावठी दारूचा सुळसुळाट कोणाच्या आशीर्वादाने..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे