जळगाव मनपा शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहपुर्वक साजरा..
जळगाव – 2025-26 या शैक्षणिक वर्षात शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राज्यभर उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दि. 12/03/2025 च्या शासन निर्णयान्वये दिले आहेत. या उपक्रमांतर्गत दि. 16/06/2025 सोमवार रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी नवोगत विद्यार्थ्यांचे आनंददायी व उत्साहवर्धक स्वागत करुन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्सवमय वातावरणात करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. याअनुषंगाने जळगाव महरानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या मनपा शाळांना आयुक्त, मनपा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या नियोजनानुसार सर्व मनपा अधिकारी यांनी दि. 16/06/2025 सोमावर रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले.जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील शाळा प्रवेशोत्सव मुख्य कार्यक्रम ऑल इंडिया मेमन फेडरेशन जळगाव मनपा शाळा क्र. 11 व मनपा शाळा क्र. 32, यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेला होता. या कार्यक्रमास जळगाव शहरी भागाचे आमदार सुरेश दामु भोळे (राजु मामा), आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त (सा.प्र.) निर्मला गायकवाड-पेखळे, प्रशासन अधिकारी खलील एम. शेख, तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी पालक उपस्थित होते.
या प्रवेशात्सवाचे प्रमुख आकर्षण इ.1लीच्या सर्व नवोगत विद्यार्थ्यांना घोड्याच्या बग्गीमध्ये बसवून शाळेत आणण्यात येवून त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच सर्व नवोगत विद्यार्थी व इ.8 वी पर्यंतचे सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठध-पुस्तक, मोफत गणवेश, मोफत बुट व सॉक्स, स्कुल बॅग व शैक्षणिक साहित्य मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. सुरेश दामु भोळे, आमदार जळगाव शहर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी क्रिडा क्षेत्रात पण लक्ष केंद्रीत करणे आवश्यक म्हणून शाळेमध्ये दररोज शारिरीक शिक्षणाचा तास घेण्यात यावे. तसेच आयुक्त, मनपा जळगाव ज्ञानेश्वर ढेरे यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करावे याबाबत मार्गदर्शन केले.