सातोद मध्ये अवैध वाळूचे डंपर भर रस्त्यावर खड्यात अडकल्याने घराच्या ओट्याचे नुकसान…
यावल – तालुक्यातील सातोद गावात लोकेश सुरेश तळेले यांचे मालकीच्या जागेवर बांधकाम सुरू आहे या बांधकामाच्या ठिकाणी “सरकार” नाव असलेले अवैध वाळू वाहतूक दाराचे डंपर आले असता ग्रामपंचायतच्या गटारीचे पाणी अनेक महिन्यापासून रस्त्याखाली मुरल्याने त्या ठिकाणी डंपरच्या वजनाने मोठा खड्डा पडला आणि त्यात अवैध वाळू वाहतुकीचे दान अडकले,बाजूला खुशाल पाटील यांच्या घराचा ओटा त्या डंपरमुळे तुटला रात्री एक जेसीबी मशीन आणून ते डंपर तेथून हलविले ही घटना आज शनिवारी दिनांक २१ जून २०२५ ( सकाळी ) रात्री १:४५ वाजेच्या सुमारास घडल्याने संपूर्ण सातोद परिसरात अवैध वाळू वाहतुकी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
डंपर चालक डंपर सह तेथून तात्काळ निघून गेला डंपर कोणाचे आणि कुठले..? आणि ते सातोद गावात येताना कोणालाही दिसले नाही हे विशेष आहे.या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये सुद्धा कैद झालेले आहे.याबाबत आता तक्रारीनुसार यावल पोलीस आणि महसूल विभाग डंपर चालकावर काय कारवाई करणार..? याकडे आता सर्वांचे लक्ष वेधून आहे.