यावल

प्रशासनाच्या  दुर्लक्षामुळे श्री महर्षी व्यास भक्तांच्या मार्गात मोठा अडथळा..

नगरपरिषदेच्या  निष्क्रियतेमुळे यावल शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप. 

यावल दि.२९ ( सुरेश पाटील ) गुरुवार दि.१० जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रात एकमेव असलेल्या यावल येथील श्री महर्षी व्यास मंदिरात व्यासपौर्णिमा तथा गुरुपौर्णिमा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत असतो परंतु यावल शहराच्या प्रवेशद्वाराजवळच भाविक,भक्तांना नागरिकांसाठी येण्या जाण्यासाठी भर रस्त्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे याकडे मात्र आमदार अमोलदादा जावळे, प्रशासक तथा प्रांताधिकारी,तहसीलदार आणि आणि शहरातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांच्या दुर्लक्षपणामुळे तसेच नगरपरिषदेच्या  निष्क्रियतेमुळे यावल शहरातील शेतकरी,नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.यावल येथे जुन्या भुसावळ नाक्याजवळ म्हणजे यावल शहरात प्रवेश करताना दर्शनी भागाजवळच बांधकाम झालेल्या चुकीच्या नियोजनातून बांधकाम झालेल्या उंच ढाप्या मुळे आणि नादुरुस्त रस्त्यामुळे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या ठिकाणी रस्ता आहे की नाला..? असा प्रश्न उपस्थित होत असून पायदळ व वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

हे यावल शहरातील लोकप्रतिनिधी समाजसेवकांना दिसून येत नसल्याने तसेच कोणीही याबाबत सक्रिय आणि आक्रमक भूमिका घेत नसल्याने तसेच यावल नगरपालिकेच्या  निष्क्रियतेची भूमिका घेऊन नागरिकांच्या सुख सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याने यावल शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त यावल शहरात व्यास मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या हजारो भाविकांना किती त्रास सहन करावा लागेल याची प्रत्यक्ष पाहणी आमदार अमोलदादा जावळे,प्रशासकीय तथा प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी केल्यास यावल नगरपालिकेचा हलगर्जीपणा आणि भोंगळ कारभार कसा सुरू आहे हे प्रत्यक्ष दिसून येईल आणि मग भाविक भक्तांना नागरिकांना शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जाण्या येण्यासाठी यावल जुन्या भुसावळ नाक्याजवळ असलेल्या उंच ढाप्या जवळ मजबूत असा भराव टाकून त्या ठिकाणचे पाणी वाहून जाण्याची तात्काळ व्यवस्था करून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहनधारकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी तात्काळ व्यवस्था करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे