शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी नशिराबाद मधील दोन शाळा घेतल्या दत्तक : मुलाच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना दप्तर वाटप..
जळगाव – राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या पत्रानुसार शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दोन शाळा दत्तक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्या मार्गदर्शना खाली “दत्तक शाळा “या उपक्रम अंतर्गत पंचायत समिती जळगाव येथील शिक्षण विस्तार अधिकारी विजय शांतीलाल पवार यांनी जि प शाळा नशिराबाद पेठ व जि प शाळा कन्या नंबर एक नशिराबाद या दोन शाळा दत्तक घेतल्या आहेत. दत्तक शाळा उपक्रमांतर्गत सदर शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नियमित भेट देऊन मार्गदर्शन करणे, शासनाच्या विद्यार्थी लाभांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, लोकसहभागातुन शाळेचा भौतिक विकास करणे, शाळेचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करणे इत्यादी बाबत कार्यवाही शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये करण्यात येईल असे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी सांगितले.सदर उपक्रमात गट विकास अधिकारी श्वेता पालवे, गट शिक्षणाधिकारी सरला पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले,शिक्षण विस्तार अधिकारी शांताराम कुंभार, केंद्र प्रमुख अविनाश पाटील यांचे सहकार्य लाभत आहे. नुकताच शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त दत्तक घेतलेल्या नशिराबाद कन्या नंबर एक जिल्हा परिषद शाळेतील 50 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले.याप्रसंगी मुख्याध्यापक प्रमोद केळकर, मीना गुळवे, सौ निशा पवार, चैतन्य पवार, भाग्यश्री पवार यांची उपस्थिती होती.