बालक नोंदवही मध्ये खाडाखोड : सावखेडासिम प्रा.आ.केंद्र कर्मचाऱ्यावर कारवाईचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश..

यावल दि.११ ( सुरेश पाटील ) – तालुक्यातील सावखेडासिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांने बालक नोंदवहीत खाडाखोड केल्याने चौकशीअंती आढळून आल्याने संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयात त सादर करावा असा आदेश जळगाव जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिला.
याबाबत जळगाव जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दि. १० जुलै २०२५ रोजी यावल तालुक्यातील सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे की,श्रीमती खल्लोबाई युनिस तडवी यांनी दि.२० मार्च २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार अडॉ.रमेश धापते DRCHO व डॉक्टर राजीव याकुब तडवी यावल तालुका आरोग्य अधिकारी यांनी दि.११ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या अहवालानुसार माहे फेब्रुवारी २०१२ मध्ये जन्म दिनांक १७/०१/२०१२ असून बाळाचे नाव जे आहे ते नाव पेन्सीलने लिहीलेले असल्याने अस्पष्ट आहे.
तक्रारदाराने अर्जासोबत जोडलेल्या जिल्हाधिकारी जळगाव यांना दिलेल्या दि.२०/०४/२०२४ च्या वैद्यकीय अधिकारी सावखेडा सिम आर १६ बालनोंदवही मध्ये दि. १७/०१/२०१२ या दिनांकास बालकाचे नाव हे वेगळेच आहे.
वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेली माहिती व बालक सेवा नोंदवहिमध्ये प्रत्यक्ष असलेल्या नोंदीनुसार बालकाच्या नावात तफावत आढळून येते.तसेच बालक नोंद वहिमध्ये माहे फेब्रुवारी २०१२ मधील नोंदी मध्ये खाडाखोड आढळून येते.वैद्यकीय अधिकारी यांनी वरील मुददया संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असा आदेश दिलेला आहे. त्यानुसार सावखेडासिम येथील वैद्यकीय अधिकारी तत्कालीन संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे आता तक्रारदार यांचे लक्ष वेधून आहे.