
जळगाव – जिल्हा परिषदेच्या जिल्हा दिव्यांग विभागातील. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांना 5 हजारांची लाच घेतांना जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. माधुरी सुनील भागवत (जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी )असे त्यांचे नाव असून त्यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याने लाच खोरांच्या गोठ्यात एकच खडबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार हे भौतिक उपचार तज्ञ तथा प्रभारी अधिक्षक वर्ग २ या पदावर शासकिय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगांव या कार्यालयात कार्यरत असून, ते दि. १४.०७.२०२५ रोजी पगार बिलाच्या कामासंदर्भात जिल्हा दिव्यांग विभाग, जिल्हा परीषद कार्यालय, जळगांव येथे गेले असता, माधुरी भागवत, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी तक्रारदार यांचे जुन, २०२५ पगार बीलामध्ये काहीही त्रुटी न काढता पगार बीलाबर सहया करून ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे १२,०००/- रू. लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक २२/०७/२०२५ रोजी ला.प्र.वि. जळगाव यांचेकडे लेखी तक्रार दिली होती
सदर तक्रारीप्रमाणे दिनांक २२/०७/२०२५ रोजी लाचपडताळणी केली असता, यातील माधुरी भागवत यांनी १०,०००/- रु. लाचेची मागणी करून, तडजोडीअती प्रथम हफ्ता म्हणून ५,०००/- रू.व उर्वरित ५,००० रुपये रक्कम इतर बिले निघाल्यावर दया, अशी पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आलोसे यांचे मागणीप्रमाणे दिनांक २४/०७/२०२५ रोजी माधुरी भागवत यांनी तक्रारदार यांचेकडून ५,०००/- रू लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्वीकारली, म्हणून माधुरी भागवत, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.सदरप्रकरणी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांचेविरुद्ध जळगाव शहर पोस्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदर कारवाई – जळगांव एसीबी चे पोलिस उप अधिक्षक,योगेश ठाकूर,पोलिस निरीक्षक,हेमंत नागरे,GPSI/ सुरेश पाटील (चालक) पोहेकाँ/ श्रीमती शैला धनगर,पोकाँ/ प्रणेश ठाकूर.पोकाँ/ सचिन चाटे, यांनी केली