गुन्हेगारीचाळीसगावब्रेकिंग

चाळीसगावात कोट्यावधी रुपयांचे (अँफेटामाईन) ड्रग्स जप्त..  

चाळीसगाव, दि.२५– चाळीसगाव महामार्ग पोलीसानी बोढरे फाटा येथे मोठी कारवाई करत ३९ किलो अँफेटामाईन हा अत्यंत घातक आणि प्रतिबंधित अमली पदार्थ पकडला. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून राज्य आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याकडे अत्यंत गंभीर प्रकरण म्हणून पाहिले जात आहे.

बोढरे फाट्याजवळ संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता पोलिसांना सुमारे ३९ किलो वजनाचा अँफेटामाईन हा अंमली पदार्थ आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार या ड्रग्जची किंमत सुमारे ४० ते ५० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तात्काळ सदर वाहनचालकास अटक करत वाहन जप्त केले आहे.या घटनेची माहिती मिळताच संबंधित चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी महामार्ग पोलीस केंद्राला भेट देत संपूर्ण कारवाईची माहिती घेतली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची माहिती दिली गेली असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हे ड्रग्ज दिल्ली येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे कर्नाटकातील बंगळुरूकडे नेत असल्याची शक्यता आहे. यामध्ये केवळ आंतरराज्य रॅकेट नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज नेटवर्क कार्यरत असल्याची भीती व्यक्त होत आहे. अँफेटामाईन हा पदार्थ प्रामुख्याने विदेशातून तस्करी करून भारतात आणला जातो आणि देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन करण्यासाठी वापरला जातो, अशी माहितीही उघड झाली आहे.

या संपूर्ण कारवाईची गांभीर्याने दखल घेत राज्याचे पोलीस महासंचालक  रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक  दत्तात्रय कराळे आणि जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे.ड्रग्जमुक्त महाराष्ट्र या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला बळ देणारी ही महत्त्वपूर्ण कारवाई ठरत असून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हावासीयांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे