जळगाव जिल्हा

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जळगाव ते पाल व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅली..

विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये व्याघ्र संरक्षणाबाबत जनजागृती

जळगाव, –जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर यावल वन विभाग व वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव ते पाल मार्गावर व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावल उपवनसंरक्षक मा. श्री. जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक मा. श्री. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनात रॅली आणि विविध उपक्रम पार पडले.

रॅली दरम्यान लालमाती येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा तसेच पाल येथील दोन शाळांमध्ये जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये वन्यजीव संरक्षण संस्था जळगावचे अध्यक्ष मा. श्री. रवींद्र फालक यांनी वाघ आणि जंगलाचे पर्यावरणीय महत्त्व स्पष्ट करत संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला. वनरक्षक श्री. राजू बोंडल यांनी सातपुडा जंगल सफारीसंदर्भात माहिती दिली.

या कार्यक्रमांतर्गत संबंधित तीन शाळांमध्ये तसेच वनकुट्यांवरील वनमजुरांना चटया वितरित करण्यात आल्या. तसेच विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव येथील सहभागी विद्यार्थ्यांसोबत सातपुडा जंगल सफारी गेट परिसरात १०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर सफारी क्षेत्रात २०० सिड बॉल्स टाकण्यात आले. सफारीदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन होण्याचा दुर्मिळ अनुभव मिळाला.

या संपूर्ण उपक्रमांच्या आयोजनासाठी रावेर वनक्षेत्रातील वन कर्मचारी, वनमजूर, ड्रायव्हर आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये व पर्यावरणप्रेमींमध्ये व्याघ्र संवर्धनाविषयी सकारात्मक जनजागृती घडवली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे