अवैध गॅस सिलेंडरचा मोठा साठा जप्त : LCB ची कारवाई..

जळगाव – दि.4 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, यांना गोपनीय माहिती मिळाली की,अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर चा साठा करुन वाहनात अवैधरित्या भरत असले बाबत माहिती मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर दोन ठिकाणी धाड टाकून घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करुन वाहनात भरताना व मोठ्या प्रमाणात साठा करुन ठेवलेल्या गैस सिलेंडर व वाहनासह एकुण ५,१६,०००/- रु.किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला.
अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करणाऱ्या दोघ १) अनिल शंकर सोनवणे वय-४८ रा.बांभोरी ता.धरणगांव जि. जळगांव २) मोईन शेख युसुफ शेख रा. तांबापुरा ता.जि. जळगांव. यांचे विरुध्द धरणगांव पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडडी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सोपान गोरे पोहेकों सलीम तडवी पोकों/छगन तावडे, पोकों/रतन गिते, पोकॉ मयूर निकम स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांनी केली आहे.