यावल नगरपरिषद लोकनियुक्त महिला नगराध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच रंगणार..

यावल ( सुरेश पाटील ) – नगरपरिषद लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष पदासाठी यावल शहरातून अनुक्रमे सौ.छायाताई अतुल पाटील,सौ.नीलिमा नितीन महाजन,सौ.रोहिणी उमेश फेगडे,सौ.विशाखा राकेश करांडे या चार प्रबळ अशा महिलांच्या नावांची चर्चा सुरू झाल्याने यावल नगरपरिषद अध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे प्राथमिक चित्र निर्माण झाले आहे.
यावल नगरपरिषद लोकनियुक्त महिला अध्यक्ष पदासाठी
महाविकास आघाडी तर्फे म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ),शिवसेना उबाटा ) तर्फे सौ.छाया पाटील यांना उमेदवारी नाही मिळाली तरी त्यांची अपक्ष उमेदवारी निश्चित आहे.
भारतीय जनता पार्टी तर्फे सौ. नीलिमा महाजन,सौ.रोहिणी फेगडे या दोन महिलांच्या नावाची चर्चा असली तरी एक नाव निश्चित होईल.तसेच राजकीय,सामाजिक गणित लक्षात घेता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे सौ.विशाखा राकेश करांडे ( यावल कृषी उत्पन्न बाजार समिती मधील धान्याचे व्यापारी राकेश करंडे यांची पत्नी ) यांचे तुल्यबळ नाव सुद्धा पुढे येत असल्याने यावल नगर परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याने नगर परिषदेच्या प्रत्येक प्रभागात वेगवेगळी चर्चा आहे.
यावल नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार शिरीषदादा चौधरी, माजी आमदार रमेशदादा चौधरी विद्यमान आमदार अमोलदादा जावळे यांच्या राजकीय,सामाजिक प्रतिष्ठेचा मुद्दा उपस्थित होणार असल्याने निकालांती कोणाचे वर्चस्व राहणार हे आपल्याला शक्यतोवर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत समजणार आहे.