१५ दिवसांत तीन दरोडयाचे गुन्हे उघड :LCB ची कामगिरी..

जळगाव – दि. २६ रोजी फिर्यादी योगेश नेताजी पाटील हे त्यांची पत्नी व त्यांचे नातेवाईक यांचेसह पुणे येथे जात असतांना चाळीसगांव ते कन्नड रोडवर नायरा पेट्रोलपंपाच्या पाठीमागे ७ ते ८ अज्ञात इसमांनी त्यांचे चारचाकी वाहनासमोर काहीतरी अवजड वस्तु फेकुन फिर्यादी यांनी त्यांची चारचाकी वाहन रस्त्याचे कडेस लावले असता त्या ७ ते ८ ईसमांनी फिर्यादी व त्यांचे सोबत असलेल्या त्यांचे नातेवाईकांना काठीने मारहाण करुन त्यांचेकडुन जबरीने सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन व नगदी रक्कम असा एकुण १२००००/- रु किंमतीचा मुद्देमाल जबरीने काढुन घेवुन गेले बाबत फिर्यादी योगेश नेताजी पाटील रा. पाचोरा ता. जि. जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरनं. ३३७/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३१०(२), ३०९ (६), ३२४ (४) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदरच्या घटनेनंतर डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, यांनी तात्काळ सदर घटनास्थळी भेट देवून गुन्हयातील अनोळखी आरोपी यांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्यास राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना सांगितले होते.
त्याअनुषंगाने Lcb पी आय यांनी पथक रवाना केले होते. तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच चाळीसगांव ते नांदगांव व नांदगाव येथुन शिरुड बंगला मार्गे छत्रपती संभाजी नगर पावेतो सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन आरोपी यांनी गुन्हयात वापरलेला ट्रक क्र. MH १२ KP ५९२५ निष्पन्न करुन ट्रक मालक याचेसह आरोपी १) अर्जुन बालाजी शिंदे २) अशोक हिरामण शिंदे ३) शंकर शिवाजी पवार ४) सुनिल हिरामण शिंदे ५) राहुल अनिल काळे ६) छगन महादेव काळे ७) श्विरे अंकुश पवार ८) राहुल अनिल शिंदे ९) संजय रामा काळे १०) रामा सुबराव काळे (ट्रक मालक) सर्व रा. रा. लक्ष्मी पारधी पेढी तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव यांना निष्पन्न करुन सदरचा गुन्हा उघडकीस आनला.
सदर गुन्हयात वापरलेला ट्रक क्र. MH १२ KP ५९२५ बाबत स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांना संपर्क साधला असता त्यांचेकडे सुध्दा नमुद आरोपी यांनी अशाच प्रकारचा गुन्हा मुरुम पो.स्टे. जि. धाराशिव येथे केला असल्याने त्यांनी यातील आरोपी नामे १) अर्जुन बालाजी शिंदे २) अशोक हिरामण शिंदे यांना मुरुम पो.स्टे. कडील गुन्हयात अटक केली असुन गुन्हयातील उर्वरीत आरोपी हे फरार आहेत. नमुद अटक आरोपी यांचा सदर गुन्हयात प्रोड्युस वारंट घेवून व उर्वरीत आरोपी यांचा शोध घेवुन त्यांना सदर गुन्हयात अटक करून गुन्हयाचा तपास करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही डॉ. महेश्वर रेड्डी, सो. पोलीस अधीक्षक, जळगांव, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल गायकवाड, पोउपनि सोपान गोरे, पोहेका लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, सलीम तडवी, पोकों/भुषण शेलार, महेश पाटील, भूषण पाटील, सागर पाटील, मयुर निकम, सचिन घुगे, सिध्देश्वर डापकर, रतनहरी गिते, ईश्वर पाटील, प्रदिप सपकाळे, गौरव पाटील, मिलींद जाधव चापोकॉ बाबासाहेब पाटील स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी केली.
स्थानिक गुन्हे शाखा जळगांव येथील अधिकारी व अंमलदार यांनी मागील १५ दिवसांत १) मुक्ताईनगर व वरणगांव येथे पेट्रोलपंपावर घडलेला दरोडा २) भुसावळ तालुका पो.स्टे. हद्दीत घडलेला दरोडा व ३) चाळीसगांव ते कन्नड रोडवर घडलेला दरोडा असे तीन दरोडयाचे गंभीर गुन्हे उघडकीस आणले.