प्रभाग क्र.१३ मधून अपक्ष उमेदवार जितेंद्र मराठेंना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

जळगाव – प्रभागातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत, सातत्याने प्रभागात राहून केलेला जनसंपर्क हीच माझी खरी ताकद आहे,” असे ठाम प्रतिपादन प्रभाग क्रमांक १३ ड मधील अपक्ष उमेदवार जितेंद्र मराठे यांनी केले आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आता कमालीची रंगत आली असून, संपूर्ण जळगाव शहरासह जिल्ह्याचे लक्ष प्रभाग १३ ड मधील या प्रतिष्ठेच्या लढतीकडे लागले आहे. भाजपकडून माजी नगरसेवक जितेंद्र मराठे यांची उमेदवारी अचानक डावलण्यात आल्यानंतर प्रभागातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. जनतेच्या अडीअडचणीत धावून जाणाऱ्या, सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याची भावना प्रभागात प्रबळ झाली आणि त्यातूनच जनतेच्या आग्रहास्तव जितेंद्र मराठे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
जितेंद्र मराठेंना मोठा जनसमर्थन मिळताना दिसत आहे.प्रचाराच्या अंतिम विकासकामांसोबतच सामाजिक बांधिलकी जपली आहे.”“मी सर्वसामान्य भाजीपाला विक्रेत्याचा मुलगा आहे. मर्यादित आर्थिक परिस्थितीतून आलेला आहे.तरी जनतेचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.