एरंडोल जवळ भीषण अपघात भरधाव ट्रॅकने घेतला एकाचा बळी..
पिंपरी येथील महंत प्रियरंजनदास जागीच ठार : संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको..

एरंडोल – दि. 21 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पिंपरी बुद्रुक येथे भरधाव ट्रकने एका दुचाकी वाहनास धडक दिल्याने पिंपरी बुद्रुक येथील महंत प्रियरंजनदास गुरु आचार्य महान वय 35 हे जागेवर मयत झाले व प्रवीण नारायण पाटील वय 23 हे जखमी असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे तातडीने हलविण्यात आले त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला बऱ्याच वेळ संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको करत महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नंतर संतप्त ग्रामस्थांची तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी समजूत काढून वाहतूक सुरळीत केली
घटनास्थळी यापूर्वी देखील अनेक वेळा गंभीर अपघात घडलेले असल्याने ग्रामस्थांनी यापूर्वी नॅशनल हायवे ऑफ इंडियाचे प्रकल्प अधिकारी यांना वारंवार स्पीड ब्रेकर व समांतर रस्ते तयार करण्यासंदर्भात निवेदन दिलेली आहे तथापि त्यावर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको केला त्याबाबत तहसीलदार प्रदीप पाटील यांनी घटनास्थळावरून प्रकल्प अधिकारी साळुंखे यांच्याशी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत चर्चा केली व ग्रामस्थांच्या मागण्या तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात सांगितले.
सदर महामार्गावर अनेक अपघात घडतात व नाहक निष्पाप लोकांचा बळी जातो. मात्र प्रशासनास नेहमीच एखादी घटना घडल्यानंतर व एखाद्याचा जीव गेल्या नंतरच जाग येते का ? असा प्रश्न उपस्थित होतो.
ईतर महत्वाच्या बातम्या
शिरसोलीत मिठाईच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धाड : 151 किलोचा साठा जप्त..