जळगाव

निमखेडी शिवारात कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा निघृण खून..

जळगाव – निमखेडी गावात कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना दि. १९ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मयत झालेल्या महिलेचे नाव दिपाली नितीन सोनवणे असे. दिपाली सोनवणे या पती नितीन विजय सोनवणे  आणि दोन मुलं आणि एक मुलगी यांच्या सोबत वास्तव्याला होत्या. हात मजुरी काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. त्यांच्यात काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होता.१९ मार्च रोजी दुपारी पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला.या वादात संतापाच्या भरात संशयित आरोपी नितीन सोनवणे याने लोखंडी विळ्याने पत्नी दिपाली सोनवणे यांच्या गळ्यावर आणि पोटावर वार करून त्यांची निघृण हत्या केली.

हत्या केल्यानंतर आरोपी हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि फॉरेन्सिक कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयतच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेसंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे