जळगाव

५ हजारांची लाच : करंज तलाठी ACB च्या जाळ्यात..

जळगाव – करंज येथील तलाठी अजय बिडवे यांच्याविरोधात ५,००० रुपयांच्या लाचमागणी प्रकरणी जळगाव एसीबी च्या पथकाने कारवाई केली आहे. या घटनेमुळे महसूल विभागात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे सजा करंज हद्दीत शेती खरेदी केली होती. या खरेदी केलेल्या क्षेत्रावर खरेदी नोंद लावण्यासाठी तलाठी अजय बिडवे यांनी ५,००० रुपये लाचेची मागणी केली होती.

या लाचमागणी बाबत तक्रारदार यांनी दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव एसीबी कडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबी पथकाने त्याच दिवशी पंचासमक्ष पडताळणी केली असता, तलाठी अजय बिडवे यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदार हे लाचेची रक्कम देण्यासाठी गेले असता, तलाठी अजय बिडवे यांना संशय आल्याने त्यांनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, लाच मागणीची पडताळणी झाल्यामुळे त्यांच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई –

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली,स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, पो.नि. हेमंत नागरे, पोहेकों/संगिता पवार, पोना/बाळु मराठे, पोकों/अमोल सुर्यवंशी व पोकों / प्रणेश ठाकुर यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे