जळगाव

पत्रकारांसाठी “प्रीमियर लीग पर्व-२” : सागर पार्क मैदानावर आज पासून रंगणार क्रिकेट महोत्सव..

२६ संघांचा सहभाग, ४ दिवसीय स्पर्धा, खेळाडूंना मोफत चहा-जेवण व आकर्षक बक्षिसे

जळगाव, दि.26 : समाजाचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या मनोरंजन व कल्याणासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेत, “पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२” चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. २६ ते २९ मार्च दरम्यान सागर पार्क मैदान येथे पार पडणार असून  (दि. २६)रोजी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.

पत्रकार दिवसरात्र ऊन, वारा, पाऊस आणि थंडीची पर्वा न करता समाजासाठी कार्यरत असतात. मात्र त्यांच्या मनोरंजनाकडे अनेकदा दुर्लक्ष होते. हीच बाब लक्षात घेऊन पत्रकारांमध्ये सुसंवाद, मैत्री आणि खेळाडूवृत्ती वाढविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत जिल्हाभरातील पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग असून एकूण २६ संघ मैदानात उतरणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १४ संघ, जळगाव शहरातील ५ संघ, संपादकांचा एक संघ तसेच लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, डॉक्टर, वकील, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर आणि पोलीस प्रशासनाचे संघ सहभागी होणार आहेत.

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील , मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ यांच्यासह आमदारांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.

विशेष म्हणजे, या ४ दिवसीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कोणत्याही खेळाडूकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. समारोप सोहळ्यात विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.ही स्पर्धा यशस्वी व संस्मरणीय करण्यासाठी आयोजकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले असून जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे