10 हजाराची लाच : यावल वनविभागाचा वनरक्षक ACB च्या जाळ्यात..

जळगाव – जिल्ह्यातील यावल वनविभागातील वनरक्षकाचे लाच प्रकरण प्रकार समोर आले आहे. वनरक्षक भैय्यासाहेब भिमराव गायकवाड (आगार रक्षक यावल, नेमणूक – वनपरीक्षेत्र, अधिकारी कार्यालय यावल पूर्व.)यांच्यावर लाचमागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
तक्रारदार हे त्यांच्या दोन बोलेरो पिकअप वाहनांद्वारे अंजाळे, पाडळसे व परिसरात लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतात. ही वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यासाठी वनरक्षक गायकवाड यांनी तक्रारदाराकडे दरमहा ₹१०,००० लाचेची मागणी केली.या प्रकरणी तक्रारदारांनी दि. २० मार्च २०२६ रोजी ACB, जळगाव कार्यालयाकडे तक्रार केली.तक्रारीनंतर ACB पथकाने पडताळणी कारवाई केली असता, पंचासमक्ष गायकवाड यांनी ₹१०,००० ची मागणी करून तडजोडीअंती ₹९,००० स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती.यानंतर सापळा रचण्यात आला. मात्र, तक्रारदार पैसे देण्यासाठी गेल्यावर गायकवाड यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यांच्या विरोधात लाचमागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान गायकवाड यांच्या अंगझडतीत ₹९,०४० रोख रक्कम तसेच दोन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले. यात एक महागडा सॅमसंग अल्ट्रा २५ (किंमत अंदाजे ₹१.१० लाख) आणि एक आयटेल कंपनीचा मोबाईल (किंमत अंदाजे ₹१,०००) यांचा समावेश आहे.
सदर कारवाई
पोलीस उप अधिक्षक,योगेश ठाकुर,रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार, कॅम्प-ला.प्र.वि. जळगांव. पोहेकों/बाळु मराठे, पोकों/ राकेश दुसाने, श्रेपोउपनिरी/सुरेश पाटील,यांनी केली.