जळगाव

जिल्हाधिकारी कार्यालयात 6 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन..

जळगाव, दि. 2  : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबधाबाबतच्या तक्रारी घेऊन या लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च व श्रम वाचावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने अर्ज नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ केली असून दि. 06 एप्रिल 2026 पासून पुढील सर्व लोकशाही दिनांसाठी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता राहणार नाही.

नागरिकांना आपले अर्ज जिल्हाधिकारी जळगाव यांच्या Jalgaon.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांकडून प्राप्त झालेले ऑनलाईन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित विभागांना lokshahidinjalgaon@gmail.com या अधिकृत ई-मेलद्वारे पाठविण्यात आले असून संबंधित विभागांनी सदर अर्जांवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करून दि. 06 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या लोकशाही दिनास उपस्थित राहावे, असेही प्रशासनाने कळविले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे