जळगाव

उपमहापौर मनोज चौधरी यांची फायर स्टेशनला अचानक भेट….

फोन बंद,पंपही बंद,घाणीचा साम्राज्य, आयुक्तांवरही नाराजी..

जळगाव – उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी आयुक्त बंगल्याजवळील फायर स्टेशनला अचानक भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान अनेक गंभीर बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या.फायर स्टेशनचा लँडलाईन नंबर मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावर उपमहापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “अशा आपत्कालीन सेवेत लँडलाईन बंद असेल तर नागरिकांनी आगीसारख्या आपत्तीच्या वेळी संपर्क कसा साधायचा?” असा सवाल उपस्थित केला. तसेच या संदर्भात वरिष्ठांना लेखी माहिती देण्यात आली आहे का, याचीही त्यांनी चौकशी केली.

पाहणीदरम्यान फायर स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर मोठ्या प्रमाणात घाणीने व्यापलेला असल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केल्यावर कर्मचाऱ्यांनी नियमित साफसफाई होत नसल्याचे सांगितले. तसेच पाणी भरण्यासाठी वापरण्यात येणारा पंपही अनेक दिवसांपासून बंद असल्याची बाब समोर आली.यावेळी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी खंत व्यक्त करत म्हटले की, “आयुक्तांचा बंगला फक्त दहा मीटर अंतरावर असतानाही फायर स्टेशनच्या या गंभीर समस्यांकडे त्यांचे लक्ष गेले नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.”

या सर्व त्रुटी पाहून उपमहापौरांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे कडक निर्देश दिले. “ही परिस्थिती त्वरित सुधारली नाही, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.उपमहापौरांच्या या अचानक पाहणीमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, संबंधित विभागाने तत्काळ उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे