जळगाव

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत..

मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन.

जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिव्यंगोपचार विभागामध्ये आता दररोज ओपीडीच्या वेळेत कक्ष क्रमांक ११५ येथे सकाळी १० ते १ या वेळेत मणक्याचे आजार : निदान व उपचार याविषयी विशेष तपासणी आयोजित करण्यात आली आहे. गरजू रुग्णांनी लाभ घेण्यासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या अस्थीव्यंगोपचार विभागातर्फे हाडांचा ठिसूळपणा या संदर्भामध्ये नियमित तपासणी सुरू असते. आता मणक्याचे आजार या संदर्भामध्ये मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशनच्या टीमने जळगावच्या शासकीय रुग्णालयात सेवा दिली आहे. दर तीन ते चार महिन्यांनी मुंबई येथील टीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येत असते. ज्या रुग्णांना कमरेचे दुखणे, सायटिका, स्पॉंडीलाइटिस, स्लिप डिस्क, कमरेच्या वेदना, पायाला सारख्या मुंग्या येणे असे मणक्याचे विविध आजार असतील तर त्यांनी तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात सकाळी १० ते १ या वेळेमध्ये कक्ष क्रमांक ११५ या ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे.

तपासणी दरम्यान गरजू रुग्णास जर शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली तर शस्त्रक्रिया देखील मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशन यांच्या सहकार्याने करून मिळणार आहे. रुग्णांनी मणक्याच्या दुखण्यासंदर्भात आयोजित तपासणी शिबिराला उपस्थिती द्यावी, असे आवाहन अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे