जळगाव
जळगाव अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नियुक्ती..

जळगाव (प्रतिनिधी) : राज्य पोलीस दलातील मोठ्या फेरबदलांतर्गत जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप रघुनाथ गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी गावित लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. यासंदर्भातील आदेश गृह विभागाकडून शुक्रवारी सायंकाळी जारी करण्यात आले.

संदीप गावित हे यापूर्वी जळगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कामकाजाची शैली, प्रशासकीय अनुभव आणि स्थानिक परिस्थितीची चांगली जाण लक्षात घेता त्यांच्या नियुक्तीकडे महत्त्वपूर्ण बदल म्हणून पाहिले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी गावित यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.