जळगाव

गॅस एजन्सी मधून सिलेंडर चोरणारी टोळी जेरबंद : LCB ची कारवाई..

जळगाव –  जिल्ह्यातील फैजपूर आणि वरणगाव परिसरात घडलेल्या गॅस सिलेंडर चोरीच्या दोन मोठ्या घटनांचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

फैजपूर येथील श्रीधर गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून २५ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून १०० भरलेले गॅस सिलेंडर चोरी करून नेले होते. या चोरीची किंमत ३ लाख ११ हजार ८०० रुपये इतकी होती. त्यानंतर वरणगाव येथेही अशाच प्रकारे गोडाऊनमधून ५७ सिलेंडर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. या दोन गंभीर चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपास पथकाने घटनास्थळांची पाहणी, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांवर लक्ष केंद्रित केले.

तपासादरम्यान शेख विलाल शेख नवी, वसीम खान शाबीर खान आणि चेतन सुरेश काळे या तिघांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी साथीदारांच्या मदतीने दोन्ही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून ६२ भरलेले सिलेंडर, ९५ रिकामे सिलेंडर आणि एक दुचाकी असा एकूण ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. आरोपींना फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

सदर कारवाई

पोलीस अधिक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे, पो.हे.कॉ. प्रितम पाटील, प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील, यशंवत टहाकळे, पो.ना श्रीकृष्ण देशमुख आणि पोलिस अंमलदार बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम, गौरव पाटील, मिलींद जाधव यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे