गुन्हेगारीजळगाव

जळगावात १६.११ ग्रॅम MD (ड्रग्स) जप्त : LCB व MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई..

जळगाव –  स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत एम.डी. (Mephedrone) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थासह कार, दोन दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना एम.डी. अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार दिनांक ४ जून २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीसांचे संयुक्त पथक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ वरील सुरेशदादा जैन कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील परिसरात सापळा रचून कारवाई केली.कारवाईदरम्यान संशयितांची मारुती सुझुकी एस-क्रॉस (MH-29-BC-5100) कार तपासण्यात आली. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्या ताब्यातून १६.११ ग्रॅम एम.डी. (Mephedrone) अंमली पदार्थ आढळून आला. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने प्राथमिक तपासणी करून संबंधित पदार्थ एम.डी. असल्याची पुष्टी केली.

या प्रकरणात रईस हारुन देशमुख (वय २७), तौसिफ सैय्यद आरिफ (वय २१) आणि कृणाल ऊर्फ लकी रमेश पाटील (वय ३०) यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी हा अंमली पदार्थ इतर साथीदाराकडून खरेदी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून संबंधित संशयितांचा शोध सुरू आहे.

जप्त मुद्देमाल :

• १६.११ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थ – ₹४८,०००

• मारुती सुझुकी एस-क्रॉस कार – ₹४,००,०००

• स्प्लेंडर प्लस मोटारसायकल – ₹५०,०००

• बजाज पल्सर मोटारसायकल – ₹७५,०००

• ३ मोबाईल फोन – ₹८०,०००

एकूण जप्त मुद्देमाल – ₹६,५३,०००

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ४७७/२०२६ नोंद करण्यात आला असून NDPS अधिनियम १९८५ कलम ८(क), २२(बी), २९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना अंमली पदार्थांबाबत कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे