जळगाव

नशिराबादमध्ये नंदकिशोर महाजन यांच्या प्रचाराला वेग; नगराध्यक्ष व नगरसेवकांची सदिच्छा भेट..

नशिराबाद – विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी नशिराबाद येथे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची सदिच्छा भेट घेत प्रचाराला गती दिली. या वेळी त्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना महायुतीच्या विजयासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या भेटीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन तसेच मोठ्या संख्येने नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमात नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन नंदकिशोर महाजन यांचे स्वागत केले.यावेळी बोलताना नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी नंदकिशोर महाजन यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, “विकासाभिमुख आणि अभ्यासू नेतृत्वाला विधान परिषदेत संधी मिळाल्यास शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळू शकतो,” असे मत व्यक्त केले.

तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित नगरसेवकांना महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तर भाजप पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत संघटनात्मक तयारीवर भर दिला. या भेटीनंतर नशिराबाद परिसरात महायुतीच्या प्रचाराला अधिक वेग मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे