जळगाव

उपमहापौर मनोज चौधरी ॲक्शन मोडवर : QR Code Waste Management सिस्टीम बाबत आढावा बैठक..

जळगाव : शहरातील घरगुती कचरा संकलनासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ICT आधारित QR Code Waste Management System च्या अंमलबजावणीतील त्रुटी, नियमितता आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या उद्देशाने आज उपमहापौर मनोज चौधरी यांनी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीस उपायुक्त गायकवाड मॅडम, सहाय्यक आयुक्त समीर बोरवली तसेच आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. शहरातील कचरा संकलन व्यवस्थेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि डिजिटल मॉनिटरिंग प्रक्रियेतील त्रुटींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रशासनास पुढील मुद्द्यांवर तातडीने माहिती व खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या—

1. शहरातील एकूण घरांपैकी किती घरांवर QR कोड बसविण्यात आले असून किती घरे अद्याप वंचित आहेत याची प्रभागनिहाय माहिती.

2. मागील १२ महिन्यांतील घरनिहाय QR कोड स्कॅनिंगचा संपूर्ण डेटा.

3. खराब, नष्ट किंवा स्कॅन न होणाऱ्या QR कोडची संख्या आणि त्यांची पुनर्स्थापना झाली आहे का याची माहिती.

4. QR कोड बसवूनही नियमित स्कॅनिंग न होणाऱ्या घरांची संख्या आणि त्यामागील कारणे.

5. स्कॅनिंग प्रणाली बंद किंवा मोबाईल कार्यरत नसल्यास कचरा संकलनाची नोंद कोणत्या पर्यायी पद्धतीने केली जाते.

6. QR कोड स्कॅनिंगची दैनंदिन, साप्ताहिक व मासिक समीक्षा कोणत्या अधिकाऱ्यामार्फत केली जाते व त्यांची जबाबदारी काय आहे.

7. कचरा संकलन वाहनांवरील GPS प्रणाली व स्कॅनर प्रत्यक्ष कार्यरत असल्याची पडताळणी कोणत्या अधिकाऱ्याने आणि किती वेळा केली याची माहिती.

8. GPS लोकेशन व QR स्कॅनिंग डेटामध्ये तफावत आढळली आहे का? असल्यास संबंधित प्रकरणांचा तपशील.

9. संपूर्ण प्रणालीचे कोणतेही थर्ड पार्टी ऑडिट करण्यात आले आहे का? असल्यास त्याचा अहवाल सादर करणे.

10. प्रत्येक घराच्या कचरा डस्टबिनवर टॅग अनिवार्य असतानाही ते का लावण्यात आले नाहीत याबाबत तातडीने खुलासा.

उपमहापौर मनोज चौधरी यांनी नागरिकांना पारदर्शक व प्रभावी कचरा व्यवस्थापन सेवा देण्यासाठी प्रणालीतील त्रुटींवर कठोर भूमिका घेत संबंधित विभागाकडून सविस्तर अहवाल मागविला असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे