जळगावब्रेकिंग

जळगाव विधान परिषद निवडणूकीत महायुतीचे नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय.. 

जळगाव –  जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचा तब्बल ५७७ मतांनी पराभव केला. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.

जिल्ह्यातील एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली मतमोजणी पार पडली.

मतमोजणीदरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी काही वैध मते अवैध ठरवण्यात आल्याचा आरोप करत प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला. तसेच प्रशासन आणि भाजपवर मिलीभगतीचे आरोपही करण्यात आले. मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नंदकिशोर महाजन यांनी स्पष्ट आघाडी राखत विजय मिळवला. निकाल जाहीर होताच जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. या विजयामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे