जळगाव

30 हजाराची लाच : जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक ACB च्या जाळ्यात..

विहीरीचे अनुदान मिळण्यासाठी मागितली लाच..

जामनेर  – जामनेर पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर यांच्याविरुद्ध 30 हजार लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांची जामनेर शिवारात शेती असुन त्यावर गां.रा.ग्रा.रो.ह.यो. सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात पंचायत समीती, जामनेर यांचेकडुन प्रस्तावित सिंचन विहीर मंजुर झाली होती. सागर नावकर, तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी), पंचायत समिती, जामनेर यांनी प्रस्तावित विहीरीची स्थळपाहणी करण्यापुर्वीच सागर नावकर यांनी तक्रारदार यांचेकडुन गावातील रोजगार सेवक यांचे मार्फत ३०,०००/- रूपये स्विकारून स्थळ पाहणी करून त्याचे फोटो काढुन नेले होते. त्यानंतर तक्रारदार यांना पंचायत समीती, जामनेर यांच्याकडून वेळोवेळी ६०,९६६/- रुपये एवढी रक्कम मिळाली होती. व उर्वरित रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार यांनी सागर नावकर यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदारास “तुम्ही विहीरीचे ठिकाण बदल केले आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाही. जर तुम्हाला विहीरीचे पुढील अनुदान (पैसे) पाहीजे असतील, तर तुम्हाला मला ३०,०००/- रुपये द्यावे लागतील” असे सांगुन लाचेची मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी सागर नावकर यांचेविरूध्द दि.०६/०४/२०२६ रोजी ला.प्र.वि.जळगाव यांचेकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या तकारीचे अनुषंगाने दि.०६/०४/२०२६, दि.०९/०४/२०२६ व दि.१४/०५/२०२६ रोजी झालेल्या लाचमागणी पडताळणी कारवाई दरम्यान सागर नावकर, तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी), पंचायत समिती, जामनेर, जि. जळगाव यांनी दि.०६/०४/२०२६ रोजी झालेल्या लाचमागणी पडताळणी कारवाईदरम्यान तक्रारदार यांना शासन योजनेअंतर्गत मंजुर सिंचन विहीरीचे काम करण्यासाठी पुढील अनुदान मिळवुन देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष तकारदार यांना ३०,०००/- रुपयाची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचेविरूध्द जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई एसीबीचे पोलीस उप अधिक्षक,योगेश ठाकुर,रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार, कॅम्प-जळगांव, हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, श्रे. पोउप. निरी. सुरेश पाटील, पोकों/राकेश दुसाने,पोकों/प्रदिप पोळ, पोकों/भुषण पाटील, यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे