जळगाव

जळगावात २४ वा भव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ २६ जुलै रोजी..

जळगाव (प्रतिनिधी): समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था, मेहरूण, जळगाव, जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना आणि भगवान सेना, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वा भव्य “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ – २०२६” रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता लाडवंजारी समाज मंगल कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभात इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, विविध शासकीय व निमशासकीय सेवेत निवड झालेले समाजबांधव तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.सत्कारासाठी इच्छुक विद्यार्थी व पात्र समाजबांधवांनी पासपोर्ट आकाराचा फोटो व गुणपत्रिकेची प्रत दि. २० जुलै २०२६ पर्यंत आपल्या गाव अथवा तालुका प्रतिनिधीकडे जमा करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

यंदा पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून पेपरलेस निमंत्रण संकल्पना राबविण्यात आली असून कार्यक्रमाची सर्व निमंत्रणे केवळ ऑनलाइन माध्यमातून देण्यात येत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या छापील निमंत्रण पत्रिका वितरित करण्यात येणार नसल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सामाजिक संस्था, सहकार्यकर्ते व देणगीदारांनी मोलाचे योगदान दिले असून त्यांचे आयोजकांनी आभार मानले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सर्व लाडवंजारी समाज बांधव, समाजसेवक, पालक, गुणवंत विद्यार्थी, युवक-युवती यांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, तसेच ही माहिती समाजातील प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्याचे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.

जिल्हानिहाय / गावनिहाय प्रतिनिधी

जळगाव :.नामदेवराव वंजारी यांच्या घरी, श्री.प्रशांत नाईक यांच्या घरी, श्री चंद्रकांत लाडवंजारी नमस्कार मॉल , भानुदास नाईक निरंजन मेडिकल मेहरूण

चिंचोली👉 • श्री सागर शरद घुगे. श्री विजय लाड जामनेर •👉 किशोर पाटील,कैलास पालवे, जितेंद्र काळे, प्रमोद पालवे, ओम खुरपडे,महूखेडा •👉 आनंदा भाऊ लाव्हरे मोयखेडा दिगर •👉 संदिप काळे, अतुल पढ़ार, सामरोद •👉 योगेश पालवे, वाकडी •👉 भूषण वंजारी, ज्ञानेश्वर खडसे, अमोल ढाकणे तळेगाव •👉नंदूभाऊ पाटील, चेतन घुगे, मालदाभाडी •👉 गजानन नानोटे, गजानन घ्यार, सोनारी •👉 प्रदीप पाटील (पालवे)एरंडोल •👉 श्री सुरेश जी सांगळे. मुक्ताईनगर •👉मनोहर काळे, देवानंद वंजारी, के डी. वंजारी,अंतुर्ली •👉 वैभव वंजारी, संदीप वंजारी, भुषण वंजारी,हरताळा •👉 दिपक डिगंबर काळे, इच्छापूर •👉 विलास भडांगे, निमखेडी •👉 अशोक लहामगे, भुसावळ •👉 रविंद्र पढार सर,वरणगाव •👉 श्री.सुनिल भाऊ काळे, श्री. रमेश काळे, कुऱ्हा •👉 देवेंद्र काळे, वराडसीम •👉 देविदास नाईक (पढार ),किनगाव •👉कैलास वराडे बोदवड •👉श्री.आनंदा पाटील,अमोल नाईक, डॉ.प्रा.सुरेश वराडे सर, राहुल भिसे, धानोरी •👉 अतुल धनराज पाटील,पाचोरा •👉 विकासभाऊ वाघ चाळीसगाव.👉 सुनिल भाऊ लोधे

तसेच सर्व तालुका व गावांतील नियुक्त प्रतिनिधींनी आपल्या परिसरातील गुणवंत विद्यार्थी, पालक व समाजबांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवावी.

कार्यक्रमाचे सहकार्य

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे 1} मुकेश टेन्ट हाऊस श्री किशोर नथु घुगे 2} विकास लाडवंजारी नायब तहसीलदार जळगाव त्यांच्या कडून आईच्या स्मरणार्थ कै.चंदाताई लाडवंजारी स्मरणार्थ,3} डॉ.गजानन सुशिल परखड👉 माऊली मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, जळगाव ,4}संतोष चाटे यश साऊंड सिस्टिम मेहरून, 5}प्रचिती मीडिया,जळगाव सचिन घुगे, सहकार्यकर्ते यांचे आयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार.

*आयोजक संस्था*

जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना – अध्यक्ष : श्री. प्रशांत नाईक (माजी नगरसेवक)

उपाध्यक्ष : श्री. नामदेव वंजारी

सचिव : श्री. महादू सोनवणे

सहसचिव : श्री. उमेश वाघ

कोषाध्यक्ष : श्री. अनिल घुगे

कार्यकारिणी सदस्य : श्री चंदुलाल सानप, श्री संतोष घुगे, श्री भानुदास नाईक, श्री उमेश आंधळे,श्री सुधीर नाईक, श्री सचिन ढाकणे, श्री रामेश्वर पाटील, श्री आबा ढाकणे, श्री संतोष चाटे, श्री अमोल लाडवंजारी.  समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था, मेहरूण –  भगवान सेना, जळगाव

जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे