पारोळाब्रेकिंग

सबगव्हाण टोलनाक्यावर भीषण अपघात : केमिकल टँकरला आग, दोघांचा मृत्यू..

पारोळा (प्रतिनिधी): धुळेहून पारोळ्याकडे येणाऱ्या GJ-18 BV-8315 क्रमांकाच्या केमिकल टँकरचा सबगव्हाण टोलनाका येथे भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या टँकरने पुढे उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर टँकरचा टायर फुटून आग लागली.

घटनेची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. अपघातात केमिकल टँकरमधील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद केली असून सुमारे अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक लवकरच पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.टँकरमध्ये टोल्युइन डायआइसोसायनेट (TDI) हे रसायन होते. हे अत्यंत क्रियाशील (Highly Reactive) ॲरोमॅटिक डायआइसोसायनेट असून लवचिक पॉलीयुरेथेन फोम, कोटिंग्ज, ॲडेसिव्ह्ज आणि इलास्टोमर्स तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरले जाते. मात्र, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टँकरमधील केमिकल सुरक्षित असून कोणतीही गळती झालेली नाही.

पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे