जळगाव

इच्छादेवी चौकात भीषण अपघात : भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक एक जण जागीच ठार..

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच बुधवारी इच्छादेवी चौक परिसरात झालेल्या भीषण अपघाताने एकाचा बळी घेतला. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ३६ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत युवकाचे नाव लीलाधर मंगल पाटील (वय ३६, मूळ रा. कठोरा, ता. जळगाव, सध्या रा. चंदू अण्णानगर, जळगाव) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लीलाधर पाटील हे नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने (एमएच-१९ ईसी-९०८४) एमआयडीसीतील ‘निर्मल पाईप’ कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाले होते. इच्छादेवी चौकात ते पोहोचताच भरधाव वेगाने आलेल्या कारने (एमएच-१९ बीएल-७०७७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर कारने सलग दोन वेळा पलटी घेतली. या अपघातात लीलाधर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील आणि रस्त्यावरील मिळून चार जण गंभीर जखमी झाले असून, नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच पंचनामा करून तपासाची प्रक्रिया सुरू केली. अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, लीलाधर पाटील यांच्या निधनाची वार्ता कळताच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार असून, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा झालेला आकस्मिक मृत्यू कुटुंबीयांसाठी मोठा आघात ठरला आहे. नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे