फैजपूर येथे काँग्रेस कमेटीच्या वतीने धनंजय चौधरी यांच्या सहभागात ‘मत वाचवा,देश वाचवा’ अभियानाची पदयात्रा..

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील फैजपूर शहर येथे मत वाचवा, देश वाचवा! संविधान वाचवा, लोकशाही वाचवा पदयात्रा काढण्यात आली .फैजपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ‘मत वाचवा, देश वाचवा’ जनजागृती व पदयात्रा अभियानात सहभागी झालो.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमितता- पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची भीती मतचोरीचे आरोप- निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकते चा अभावया विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.
या सर्व प्रकारांमुळे सामान्य नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर तसेच देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांविषयी चर्चा करण्यात आली.यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२६ चे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रौढ मताधिकाराच्या तत्त्वावर आधारित या अनुच्छेदाचे महत्त्व अधोरेखित करत, लोकसभा व विधानसभा निवडणुकां मध्ये प्रत्येक पात्र भारतीय नागरिकाचा मतदानाचा अधिकार अबाधित राहणे किती आवश्यक आहे, याची जाणीव नागरिकांना करून देण्यात आली.
मतदानाचा अधिकार हा लोकशाही चा पाया आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे मत सुरक्षित राहिले पाहिजे आणि निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व विश्वासार्ह असली पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे!या जनजागृती पदयात्रा अभियानात फैजपुर शहरातील काँग्रेस कमिटीच्या सर्व पदधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी आपला सहभाग नोंदविला .