जळगाव जिल्हा

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या विभागीय अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार रविन्द्र कोलते यांची निवड..

न्हावीच्या शिरपेचात मानाचा तुरापत्रकारिता आणि सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेत महत्त्वाची जबाबदारी!

यावल ( प्रतिनिधी ) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात विभागीय अध्यक्षपदी रविन्द्र कोलते , जळगाव शहरी भाग जिल्हाध्यक्षपदी सलीम पटेल व सोशल मिडिया विभागाच्या पुर्व जिल्हाध्यक्षपदी मिलींद जंजाळे यांची एकमताने निवड पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन

साकळी येथील रहिवासी मिलिंद साहेबराव जंजाळे यांची भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची बैठक दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीत सर्वांच्या एकमताने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. या निवडीमुळे साकळी गावाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला असून, पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव जीवन मुरलीधर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश अध्यक्ष अय्युब पटेल यांच्या उपस्थित पार पडली. या बैठकीत पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेच्या कार्याचा विस्तार, पत्रकारांचे संघटन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने संघटनात्मक जबाबदाऱ्यांबाबत निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत साकळी, न्हावी आणी फत्तेपुर तालुका जामनेर येथील पत्रकारांच्या तथा सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या विविध पदांवर सर्वानुमते निवड करण्यात आली.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अय्युब जी. पटेल आणि प्रदेश सचिव जीवन मुरलीधर चौधरी यांच्या आदेशा अनुसार ही नियुक्ती करण्यात आली.

जनसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या लेखणीला संघटनात्मक बळ!

पत्रकारिता ही केवळ बातम्या प्रसिद्ध करण्यापुरती मर्यादित नसून, समाजातील अन्याय, प्रशासकीय त्रुटी, नागरिकांच्या समस्या आणि सर्वसामान्यांच्या हक्कांचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न व्यापक स्तरावर पोहोचविण्याची जबाबदारी महत्त्वाची ठरणार असल्याची निवड झालेल्या पत्रकारांनी व्यक्त केली.

पत्रकारिते सोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय असून,या कार्य प्रवासात भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या सोशल मीडिया पूर्व जिल्हाध्यक्षपदासह शहरी विभाग जिल्हाध्यक्ष व विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणे ही महत्त्वाची बाब मानली जात आहे.या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न, ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि जनहिताच्या विषयांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती

या बैठकीला भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष अय्युब जी. पटेल, प्रदेश सचिव जीवन चौधरी, यावल तालुकाध्यक्ष फिरोज तडवी, प्रदेश संघटक बाळासाहेब आढाळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य ए. टी. पाटील आणि यावल तालुका कार्यकारिणी सदस्य यासीन सुभान तडवी यांची उपस्थिती होती.यावेळी जिल्हाध्यक्ष (शहरी भाग) म्हणून जामनेर तालुका फत्तेपूर येथील जेष्ठ पत्रकार सलीम रशीद पटेल यांची निवड करण्यात आली. तसेच जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या विभागीय अध्यक्षपदी रवींद्र घनशाम कोलते यांची निवड करण्यात आली.या नियुक्त्यांमुळे संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळेल आणि विविध स्तरांवर पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

साकळीच्या पत्रकारितेचा सन्मान

ग्रामीण भागातील पत्रकारांना अनेक आव्हानांचा सामना करत आपले कर्तव्य बजावावे लागते. मर्यादित साधनसामग्री, विविध अडचणी आणि लोकांच्या अपेक्षा यांचा समतोल राखत पत्रकारिता करणे हे आव्हानात्मक काम आहे. अशा परिस्थितीत साकळी येथील मिलिंद साहेबराव जंजाळे यांची जिल्हास्तरीय जबाबदारीवर निवड होणे ही गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या प्रश्नांप्रती असलेली तळमळ यांना संघटनात्मक व्यासपीठ मिळाल्याने त्यांच्या पुढील कार्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडीमुळे पत्रकार महेश पाटील,रणजीत भालेराव , सुनिल पिंजारी, नितिन बडगुजर, गोकुळ कोळी यांच्या सह साकळी परिसरातील नागरिक, पत्रकार मित्र आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छांचा वर्षाव!

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या सोशल मीडिया पूर्व जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मिलिंद साहेबराव जंजाळे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. आगामी काळात पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, पत्रकारांमध्ये समन्वय वाढविणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पत्रकारिता आणि पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे