जळगाव

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

जळगाव, : धावपळीच्या जीवनशैलीतून काही क्षण स्वतःसाठी काढत निसर्गाच्या सान्निध्यात शरीर आणि मनाला नवचैतन्य देणारा ‘Sunrise & Surrender – The Morning Journey’ हा अनोखा उपक्रम २७ सप्टेंबर २०२६ रोजी जैन हिल्स येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘The Unplug Project’ च्या माध्यमातून होणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता होणार आहे. हा केवळ रनिंग इव्हेंट नसून धावणे, निसर्गभ्रमंती, ध्यान, लाइव्ह म्युझिक, डीजे, डान्स, कॉफी आणि उत्तम खाद्यसंस्कृती यांचा अनुभव देणारी सकाळची खास जर्नी असणार आहे.

निसर्गरम्य परिसरात Scenic Run आणि Nature Walk सोबत ध्यान, लाइव्ह म्युझिक आणि फ्री-फ्लो डान्सचा आनंद सहभागींना घेता येणार आहे. ‘Not just a run. Not just a party.’ या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करणे हा आहे. ‘Move, Breathe, Dance, Belong’ या भावनेतून जळगावकरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.

अहमदाबादचे पारस दलाल सादरीकरण करणार

या उपक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे अहमदाबाद येथील नामवंत आर्टिस्ट पारस दलाल यांची विशेष उपस्थिती असेल. त्यांच्या सादरीकरणामुळे सकाळच्या या अनुभवाला संगीत आणि मनोरंजनाची वेगळी रंगत मिळणार आहे. २७ सप्टेंबरची सकाळ जळगावकरांसाठी ‘Run पासून Relaxation पर्यंत’ आणि ‘Music पासून Meditation पर्यंत’ चा नवा अनुभव घेऊन येणार आहे.

१७ सप्टेंबरपर्यंत Early Bird नोंदणी

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे