जळगाव

जळगाव महापालिकेत महापौर दीपमाला काळे यांनी घेतली बांधकाम विभागाची बैठक..

जळगाव : शहर महानगरपालिकेत महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या तक्रारी आणि तातडीने करावयाची कामे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आयुक्तांमार्फत प्राप्त झालेली अत्यंत तातडीची विकासकामे लवकरात लवकर सादर करून त्यांची अंमलबजावणी त्वरित सुरू करावी, असे स्पष्ट आदेश महापौरांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

गतिरोधक आणि नगरसेवकांच्या प्रस्तावांवर भर

शहरात अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने गतिरोधक (Speed Breakers) उभारण्याची तीव्र गरज निर्माण झाली असून यासंदर्भात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर मागण्या प्राप्त झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांची/विभागाची आवश्यक परवानगी तातडीने मिळवावी आणि गतिरोधकांचे काम मार्गी लावावे, असे निर्देश महापौरांनी दिले. तसेच विविध प्रभागांतील नगरसेवकांनी सादर केलेले विकासकामांचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता ते तातडीने कार्यान्वित करावेत, अशी कडक सूचनाही त्यांनी केली.या बैठकीत बांधकाम विभागाशी संबंधित नागरिकांच्या काही तक्रारींवरही सविस्तर चर्चा झाली. शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि इतर समस्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, अधिकाऱ्यांनी तक्रारींचे त्वरित निवारण करून दिलासा द्यावा, असे महापौरांनी सांगितले. या बैठकीस शहर अभियंता आर. टी. पाटील यांच्यासह बांधकाम विभागातील सर्व संबंधित अभियंता आणि अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे