जळगाव

आकाशवाणी चौकाजवळ उड्डाणपुलावर भीषण अपघात : भरधाव ट्रकने एकास चिरडले..

जळगाव – शहरातील आकाशवाणी उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. कामावर जाणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकच्या चाकाखाली आल्याने रवींद्र  चौधरी (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. ते एका या खासगी वित्तीय कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. सकाळच्या वर्दळीच्या वेळी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आकाशवाणी उड्डाणपुलावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी रवींद्र चौधरी दुचाकीने कामावर निघाले होते. सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास ते आकाशवाणी उड्डाणपुलावरून जात असताना भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे ते रस्त्यावर कोसळले आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक आणि दुचाकी ताब्यात घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

रवींद्र चौधरी यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि वृद्ध आई असा परिवार आहे. कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. एका कुटुंबाचा आधार हिरावून घेणाऱ्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आकाशवाणी उड्डाणपुलावरील वाढती अवजड वाहतूक आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता दुर्लक्षित करून चालणार नाही. अपघात घडल्यानंतर केवळ पंचनामा आणि तपासापुरती कार्यवाही न राहता, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. वाहतुकीचे योग्य नियोजन, धोकादायक ठिकाणी प्रभावी नियंत्रण, आवश्यक सूचना फलक आणि अवजड वाहनांच्या वर्दळीचे नियमन याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

एका निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासन आकाशवाणी उड्डाणपुलावरील वाहतूक सुरक्षेला प्राधान्य देणार का, हा प्रश्न आता जळगावकरांकडून उपस्थित केला जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे