जळगाव

जळगावात शिल्प हॉस्पिटल व खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा उद्या संयुक्त शुभारंभ..

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी ५ वाजता उद्घाटन : अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा व सुपरस्पेशालिटी उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध होणार

जळगाव : जळगावच्या आरोग्यसेवा क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडत असून, शिल्पा हॉस्पिटल आणि खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या दोन्ही रुग्णालयांचा संयुक्त शुभारंभ सोहळा शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते या दोन्ही रुग्णालयांचे उद्घाटन होणार आहे.

अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, तज्ज्ञ डॉक्टर आणि विविध उपचार सुविधांनी सुसज्ज असलेल्या या रुग्णालयांमुळे जळगावसह परिसरातील रुग्णांना विविध आजारांवरील उपचार आणि सुपरस्पेशालिटी वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

शिल्प हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी व त्वचारोग उपचारांच्या सुविधा

शिल्प हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी विभागांतर्गत अपघातांमुळे झालेल्या गंभीर जखमा, हाताच्या टेंडन व रक्तवाहिन्यांना झालेल्या दुखापती, जन्मजात व्यंग, जखमा आणि कर्करोगाशी संबंधित शस्त्रक्रिया अशा विविध उपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत.याशिवाय हेअर ट्रान्सप्लांट अर्थात केशरोपण, कॉस्मेटिक सर्जरी, स्तनांच्या सौंदर्यविषयक शस्त्रक्रिया, नाकाचा आकार सुबक करण्यासाठी शस्त्रक्रिया, शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपचार, जुन्या जखमांचे तसेच भाजल्यानंतर निर्माण झालेल्या व्रणांचे उपचार आणि पायांतील फुगलेल्या नसांवरील उपचारही येथे उपलब्ध असतील.

त्वचारोग व लेझर विभागात विविध त्वचारोगांवर उपचार, अत्याधुनिक लेझर उपचार तसेच केसांशी संबंधित विविध समस्यांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये सुपरस्पेशालिटी उपचार

खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये ट्रॉमा क्रिटिकल केअर, हृदयरोग उपचार आणि विविध सुपरस्पेशालिटी वैद्यकीय सेवा उपलब्ध असणार आहेत. रुग्णालयात अत्याधुनिक अतिदक्षता विभाग (आयसीयू), अपघात व आपत्कालीन उपचार विभाग, शस्त्रक्रिया विभाग, प्लास्टिक सर्जरी विभाग आणि अस्थिरोग विभागाचा समावेश आहे.

हृदयरोग विभागांतर्गत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, तसेच न्यूरोसर्जरी, युरोलॉजी आणि मेंदूविकारांवरील उपचारांच्या सुविधाही येथे उपलब्ध असतील. विविध प्रकारच्या सुपरस्पेशालिटी शस्त्रक्रियांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

जळगावच्या आरोग्यसेवेला मिळणार बळ

दोन्ही रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि विविध उपचार सुविधा उपलब्ध होणार असल्याने अपघातग्रस्त रुग्ण, हृदयरोगी तसेच विविध गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी मदत होण्याची अपेक्षा आहे. विशेष उपचारांसाठी रुग्णांना उपलब्ध होणाऱ्या स्थानिक वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

या संयुक्त शुभारंभ सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. श्रीराज महाजन व डॉ. सुभा महाजन यांनी केले आहे.

शुभारंभ : शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६

वेळ : सायंकाळी ५ वाजता

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे