यावल

साने गुरुजी विद्यालयाच्या विकासासाठी ४०.०८ लाखांच्या कामांचे भूमिपूजन..

लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या हस्ते विकासकामांना सुरुवात

यावल ( प्रतिनिधी ): वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबविण्यात येत असून, याच अभियाना अंतर्गत साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, यावल येथे ४०.०८ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

साने गुरुजी विद्यालयाच्या पूर्व गेट व्हावे ही मागणी नागरिकां सोबत पालकांनी व विद्यार्थिनी यांची होती… मागील बाजूच्या गेट मुळे मुलींची छेडछाड असे प्रकार घडले होते. नागरिकांच्या व विद्यार्थिनींच्या या मागणीची दखल घेत सौ. छायाताई अतुल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार आता या नवीन प्रवेशद्वाराच्या कामाला सुरुवात होत आहे.यासोबतच संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करून शाळेला नवे रूप देणे, विद्यार्थ्यांसाठी ओपन जिम उभारणे तसेच लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य बसविणे, अशा विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे.                          या कामांमुळे शाळेच्या परिसराचा विकास होण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, शिक्षण व क्रिडा सांस्कृतीक सभापती पराग सराफ, शिवसेनेचे गटनेते नगरसेवक सागर चौधरी, नगरसेवक निसार शेख, नगरसेविका वैशालीताई बारी, समीर खान,मजहर शेख,करीम मन्यार, निलेश बारी, नगरपालीकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता संग्राम शेळके, मुख्याध्यापक एम के पाटील, विलास काटकर ,अनिल इंगळे , विजय नन्नवरे , देविदास फेगडे , नितीन बारी यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावल शहराच्या सौंदर्यात भर घालणारी विविध विकास कामे

याच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत यावल शहरात अन्य महत्त्वाची विकासकामेही हाती घेण्यात येणार आहेत. बसस्थानक परिसरात वॉटर एटीएम उभारणे, बोरावल गेट परिसरातील शिवतीर्थ येथे शेतकरी शिल्प उभारणे, फैजपूर– चोपडा रस्त्यावरील डिव्हायडरमध्ये आकर्षक शिल्प उभारणे, कलाकार कट्टा विकसित करणे, इनडोअर जिमची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच वृक्षारोपण करणे, अशा विविध कामांचा यात समावेश आहे.

या विकासकामांमुळे यावल शहरातील नागरिकांना नवीन सुविधा मिळण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. शैक्षणिक सुविधांपासून ते सार्वजनिक ठिकाणांच्या सुशोभीकरणा पर्यंत विविध कामांचे नियोजन करण्यात आल्याने शहराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे