जागतिक रक्तदाता दिना निमित्त जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः रक्तदान करून दिला रक्त दानाचा संदेश…
🩸रेडक्रॉस रक्तकेंद्र व रोटरी क्लब जळगाव वेस्टच्या वतीने जागतिक रक्तदाता दिवस साजरा..
जळगाव – दि. 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे हे 20 वे वर्ष असून “Thank you blood donor..! ” या संकल्पनेनुसार यावर्षी हा दिवस सर्व रक्तदात्यांना धन्यवाद देऊन साजरा करण्यात आला.
जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून रेडकॉस रक्त केंद्र आणि रोटरी क्लब जळगाव वेस्टच्या वतीने जिल्ह्यात चार ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले.या रक्तदान शिबिराची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉसचे पदसिद्ध अध्यक्ष मा. श्री आयुष प्रसाद(आयएएस) यांनी स्वतः रक्तदान करून केले आणि सर्व समाजाला रक्तदानाचा संदेश दिला. “रक्तदान श्रेष्ठदान” असून नियमित स्वरूपात प्रत्येक सुदृढ नागरिकाने रक्तदान करून जीवनदानाच्या या यज्ञात सहभागी व्हावे अशा शब्दात जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व रक्तदान शिबिर आयोजक व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष यांनी देखील स्वतः रक्तदान करून वर्षभरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, रेडक्रॉस चेअरमन विनोद बियाणी रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारणी सदस्य अनिल शिरसाळे, रोटरी क्लब जळगाव वेस्टच्या अध्यक्षा सरिता खाचणे, सचिव मुनिरा तरवारी, प्रकल्प प्रमुख हितेश मंडोरा, राहुल मोदीयानी, सहप्रशासकीय अधिकारी डॉ.राजेश सुरळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.