यावल

व्हॉइस ऑफ मिडिया तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी ललित फिरके कार्याध्यक्षपदी डी .बी.पाटील

यावल (प्रतिनिधी)व्हॉइस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेच्या तालुका कार्यकारणी निवडीची बैठक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल व जिल्हा कार्याध्यक्ष विकास भदाणे यांचे प्रमुख उपस्थितीत रविवारी सायंकाळी येथील खरेदी विक्री संघाची सभागृहात पार पडली. तालुकाध्यक्षपदी ललित फिरके तर कार्याध्यक्षपदी डी. बी .पाटील यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल व जिल्हा कार्याध्यक्ष विकास भदाणे यांनी संयुक्तपणे संघटनेची आवश्यकता सांगत, ही संघटना राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून संघटना सर्व क्षेत्रातील पत्रकारांसाठी संघटना खुली असल्याचे सांगितले पत्रकारांच्या अडीअडचणी तसेच यासह पत्रकारांना येणाऱ्या पत्रकारिता जीवनात येणाऱ्या विविध अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहील असेही त्यांनी सांगितले. जिल्हा पदाधिकारी फैजपूरचे नंदकिशोर अग्रवाल यांनीही संघटनेची सविस्तर माहिती दिली सूत्रसंचालन जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा तालुका प्रवक्ते शेखर पटेल यांनी केले बैठकीत तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

अध्यक्ष -ललित फिरके (न्हावी) कार्याध्यक्ष -डी.बी . पाटील (यावल) उपाध्यक्ष – समीर तडवी (फैजपुर ), नितीन झांबरे (भालोद ) सचिव – ज्ञानदेव मराठे, सहसचिव -तेजस यावलकर (यावल) , कोषाध्यक्ष – सुनील गावडे (यावल ) , तालुका प्रवक्ते – शेखर पटेल (यावल) कार्यकारिणी सदस्य – याकुब पिंजारी संतोष चौधरी, खुशाल पाटील, शाकीर मलत. शे. काबीज, भरत कोळी. यांची निवड करण्यात आली. तर

जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून–सुरेश पाटील , अरुण पाटील , (यावल) यांचा समावेश आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे