ब्रेकिंगभुसावळ

शेतीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी १२ हजाराची लाच : कोतवालासह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात

भुसावळतालुक्यातील कुऱ्हे पानाचे या गावात तक्रारदार यांनी २ एकर शेतजमीन विकत घेतली आहे .सदर शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रादार यांचे स्वतःचे नावं लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय कुऱ्हे पानाचे ता.भुसावळ येथे नांव लावणेसाठीचे प्रकरण टाकले होते सदर प्रकरणात भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी त्यात त्रुटी काढून तक्रारदार यांना भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटण्यास सांगितले होते . तक्रारदार यांनी कोतवाल रवींद्र धांडे यांची भेट घेतली असता कोतवाल रवींद्र धांडे यांनी तक्रारदार यांना मी तुमचे काम मंडळ अधिकारी योगिता पाटील यांच्या कडून करून आणतो असे सांगून तक्ररदार यांना ७/१२ च्या उताऱ्यावर नावं लावण्याच्या मोबदल्यात मंडळ अधिकारी यांचे नाव सांगून १५००० रुपयांची लाचेची मागणी केली.दरम्यान तक्रारदार यांनी १८ एप्रिल रोजी तशी तक्रार दिली होती. त्यावरून आज रोजी पंचासमक्ष पडताळणी कारवाई केली असता यातील कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्या कडे प्रथम १५००० रु ची मागणी केली तडजोडीअंती १२००० रु लाच रकमेची मागणी करून लाचेची रक्कम हरीश देविदास ससाणे(खासगी इसम)यांचे कडे देण्यास सांगितले यातील खाजगी इसम हरीश देविदास ससाणे यांनी तक्रारदार यांचे कडून लाचेची रक्कम १२००० रुपये कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे यांच्या साठी स्वतः पंचासमक्ष स्वीकारले असता त्यांना एसीबी विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या दोघां विरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे